सोलापूर : आजपासून सोलापुरातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या पाच तालुक्यात संचारबंदी (Solapur Lockdown) लागू होत आहे. या संचारबंदीला व्यापाऱ्यांचा मात्र विरोध आहे. पंढरपूर व्यापारी महासंघाने संचारबंदीचे आदेश धुडकवात काळे झेंडे लावून दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कोरोना निर्बंधांबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तालुक्यांचा उल्लेख करत येथील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं या तालुक्यांमध्ये संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून, म्हणजेच आजपासून पुढील आदेशापर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 4768 रुग्णांपैकी 4140 रुग्ण हे पंढरपूर, माळशिरस, माढा, सांगोला आणि करमाळा या तालुक्यातील आहेत. जाणून घेऊया जिल्हानिहाय आकडेवारी,

पंढरपूर : 1098 रुग्ण
माळशिरस : 849 रुग्ण
सांगोला : 915 रुग्ण
माढा : 784 रुग्ण
करमाळा : 494 रुग्ण

संचारबंदी दरम्यान काय सुरु, काय बंद?

सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात कडक निर्बंध
13 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवांची दुकानं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार
अत्यावश्यक सेवांमध्ये नसलेली दुकानं पूर्णपणे बंद
कोणतेही मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी
विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी
अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात पूर्णपणे संचारबंदी लागू
खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतूक सुरु

महत्त्वाच्या इतर बातम्या :

विधान परिषदेवरील 12 नामनियुक्त सदस्यांच्या निवडीचा पेच सुटणार का?

खाकी वर्दीची आगळी वेगळी संवेदनशीलता; स्वतःचं बालपण आठवून दंड वसूल करण्याऐवजी पोलीसांनीच भरला दंड

from maharashtra https://ift.tt/3AIpkjX
https://ift.tt/eA8V8J
Home
maharashtra
Solapur Lockdown : सोलापुरातील पाच तालुक्यांत आजपासून संचारबंदी, व्यापाऱ्यांचा मात्र विरोध; काय सुरु, काय बंद?
https://ift.tt/eA8V8J
शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१
Solapur Lockdown : सोलापुरातील पाच तालुक्यांत आजपासून संचारबंदी, व्यापाऱ्यांचा मात्र विरोध; काय सुरु, काय बंद? https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports