शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

खाकी वर्दीची आगळी वेगळी संवेदनशीलता; स्वतःचं बालपण आठवून दंड वसूल करण्याऐवजी पोलीसांनीच भरला दंड https://ift.tt/eA8V8J

नागपूर : समाजामध्ये पोलिसांची प्रतिमा नेहमीच डागाळलेली राहते. त्यातल्या त्यात वाहतूक पोलिसाने एखाद्याची गाडी थांबविली म्हणजे नियमांची आडकाठी करून दंड लावणारच हे निश्चित. त्यामुळे रस्त्यावर पांढऱ्या कपड्यात वाहतूक पोलीस दादा उभा दिसल्यास वाहतूक नियम न पाळणारे एकतर रस्ता बदलतात किंवा पळ काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नागपूरात एका ऑटो चालकाला वाहतूक पोलिसांच्या संवेदनशीलतेचा वेगळाच अनुभवायला मिळाला, जेव्हा खुद्द पोलिसांनी त्या ऑटो चालकाचा दोन हजरांचा दंड स्वतः भरला.

नागपूरच्या कामठी भागात राहणारे रोहित खडसे नावाचे ऑटोचालक कोरोना महामारी, वारंवार लागणारे लॉकडाऊनमुळे आधीच त्रस्त होते. बाजारपेठ, स्कूल, कॉलेज सर्वकाही बंद असल्याने ऑटो चालवून मिळणाऱ्या उत्पन्नात चार सदस्यांच्या कुटुंबाचा पोट भरणे कठीण झाले होते. त्यात 9 ऑगस्ट रोजी बर्डी परिसरात त्यांनी चुकून नो पार्किंग मध्ये त्यांचे ऑटो उभे केली आणि परिसरात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी त्यांच्या ऑटोवर नो पार्किंग संदर्भात 500 रुपयांचा दंड लावला.

संगणकीकृत प्रणालीतून रोहित यांच्या ऑटोवर आधीचे ही दोन दंड असल्याचे कळले. त्यामुळे दंडाची एकूण रक्कम दोन हजार झाली. वाहतूक पोलिसांनी कर्तव्य म्हणून रोहित यांच्याकडे दोन हजारांच्या दंडाची रक्कम मागितल्यावर रोहित याने तेवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहतूक पोलिसांना नाइलाजास्तव रोहित यांचे ऑटो जप्त करावी लागली.

नुकतंच बाजारपेठा सुरु झाल्यामुळे नेमकं कमाईच्या दिवसात पोलिसांकडून ऑटो जप्त झाल्याने रोहित समोर भविष्याच्या आर्थिक संकटाचे प्रश्न ही निर्माण झाले. त्याने मित्रांकडे उसनवारीने पैसे मागितले, मात्र प्रत्येकाची अवस्था तशीच असल्याने त्याला कुठून ही पैसे मिळाले नाही. अखेर रोहितने जड अंतःकरणाने स्वतःच्या 7 वर्षीय मुलाच्या गुल्लकमधून पैसे काढण्याचे ठरविले. लहानग्यांची गुल्लक तोडून त्याचे मन मोडण्याचे उद्दिष्ट नसताना ही पोटाची खळगी भरण्यासाठी ऑटो सोडविणे आणि त्यासाठी दोन हजारांचे दंड भरणे आवश्यक होते. त्यामुळे रोहितला मुलाची गुल्लक फोडावी लागली.

गुल्लक फोडून त्यातून नाण्यांच्या स्वरूपात निघालेली दोन हजार रुपयांची रक्कम एका प्लास्टिक पिशवीत घेऊन जेव्हा रोहित सीताबर्डी वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात पोहोचला तेव्हा तिथले इन्चार्ज वाहतूक पोलीस निरीक्षक अजय मालवीय यांना तो उगीच पोलिसांची मस्करी करायला आल्याचे वाटले. त्यांनी कडक शब्दात रोहितला एवढे नाणे का आणले, दोन हजार रुपयांचे नाणे कोण मोजणार असे विचारले. तेव्हा आधीच आर्थिक अडचणींनी निराश असलेला आणि त्यावरून मुलाचे मन मोडून त्याची गुल्लक फोडून दंडाच्या रकमेची व्यवस्था करणारा रोहित एकदम गहिवरला. रडत रडत त्याने सर्व हकीकत वाहतूक पोलीस निरीक्षक अजय मालवीय यांना सांगितली. तेव्हा अजय मालवीय यांना ही एका मुलाचे मन मोडून असे दंड वसूल करणे रुचले नाही.

मात्र, नियमाप्रमाणे दंडाची रक्कम वसूल करणे हे पोलीस म्हणून कर्तव्य असल्याने अजय मालवीय यांनी स्वतःकडून रोहित यांच्यावरील दोन हजारांचे दंड भरून दिला. तसेच रोहित खडसेला त्याच्या मुलाला वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात आणण्यास सांगितले. पोलिसांच्या निर्देशाप्रमाणे रोहित आपली पत्नी आणि दोन्ही मुलांना घेऊन वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात आला तेव्हा मुलाच्या गुल्लक मधून काढलेले सर्व पैसे मुलांच्या हातात परत करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण खडसे कुटुंब पोलिसांच्या या दातृत्वाला पाहून डोळ्यात आनंदाश्रू घेऊन आपल्या घरी परतले. यापुढे कधीच वाहतूक नियम मोडणार नाही अशी शपथ ही रोहित खडसे याने घेतली.

महत्वाच्या बातम्या :

विधान परिषदेवरील 12 नामनियुक्त सदस्यांच्या निवडीचा पेच सुटणार का?

<a href="https://ift.tt/3sgrUuy Corona Cases : राज्यात आज 5,609 नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

<a href="https://ift.tt/3yJR2fA Maharashtra Majha Vision : राज्याच्या राजकारणात जातीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जन्मानंतर मोठा झाला : राज ठाकरे

from maharashtra https://ift.tt/3lWU64r
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports