शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

Navi Mumbai : कोपरखैरणे पोलीस ठाण्यात आरोपीचा संशयास्पद मृत्यू,  CID चौकशी सुरु https://ift.tt/eA8V8J

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर 19 येथे 22 वर्षाचा तरुण चोरी करताना रंगेहाथ पकडला गेलेल्या तरुणाला स्थानिक नागरिकांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाण झाल्यावर हा तरुण दोन तास कोपरखैरणे पोलिस ठाणे येथे होता. अचानक या तरुणाला उलट्या झाल्याने व चक्कर आल्याने बेशुध्द अवस्थेत तातडीने या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रुग्णालयाने या तरुणाला मृत घोषित केले. या तरुणाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला की जमावाने मारहाण केली याचा तपास पुणे येथील सीआयडी अधिकारी शुक्रवारी सायंकाळी उशिरा पर्यंत करत होते.

कोपरखैरणे येथे गुरुवारी मध्यरात्री एका चोरट्याला चोरी करताना रंगेहाथ जमावाने पकडले. यानंतर पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून पोलिसांना पाचारण करून या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या चोरट्याला पोलिस ठाण्यात दोन तास बसवून ठेवले. हा तरुण जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात बसला असताना अचानक या तरुणाची तब्येत गंभीर झाल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या. पोलिसांनी ताबडतोब या तरुणाला घेवून रुग्णालय गाठले. मात्र उपचारासाठी दाखल केल्यावर या तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कोपरखैरणे सेक्टर 5 येथे  हा मृत तरुण वास्तव्यास होता. मयताचे नाव  दिनेश चव्हाण असून त्याच्यावर घरफोडी, चोरी करणे असे 7 गुन्हे दाखल आहेत. प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे. सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.चोरट्याला कोणी मारहाण केली याचा शोध घेतला जात असून पोलिसांची कुमक कोपरखैरणे येथे तैनात करण्यात आली आहे.चोरट्याला मारहाण कोपरखैरणे सेक्टर 19 मधील होळी मैदान परिसरात झाली आहे.

या तरुणाला जमावाने लाठ्या-काठ्या, दगडांनी मारहाण केल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला असतानाही त्याला रुग्णालयात न नेता पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याने पोलीस देखील अडचणीत सापडले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/3xM0WvC : आमच्याशी समन्वय नसल्याने पत्रकार दानिश सिद्दीकीची हत्या; तालिबान्यांचे स्पष्टीकरण

<a href="https://ift.tt/3m18Hf7 vs ENG, 1st Innings Highlights : दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या 3 बाद 119 धावा

<a href="https://ift.tt/2UhGQfl Corona Cases : राज्यात आज 6,686 नव्या कोरोनाबाधितांची भर तर चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली

from news https://ift.tt/3CJlVTI
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports