शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

Breaking News LIVE : जाणून घ्या दिवसभराच्या बातम्या एका क्लिकवर... https://ift.tt/eA8V8J

राज्यात काल 6,686 नव्या कोरोनाबाधितांची भर तर चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल 6,686  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 80 हजार 871 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85टक्के आहे.

राज्यात काल 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  62 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (1), परभणी (40), हिंगोली (81),   नांदेड (51), अमरावती (57), अकोला (37), वाशिम (21),  बुलढाणा (6), यवतमाळ (16), वर्धा (5), भंडारा (1), गोंदिया (3), चंद्रपूर (83),  गडचिरोली (25) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 522 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर, अकरावी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू
राज्यात अकरावी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र,पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. सदर 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत आज जाहीर करण्यात आले आहे.  पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील. उद्यापासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरायचा आहे. तर 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान अकरावी प्रवेश अर्ज चा भाग 2 विद्यार्थ्यांना भरायचा आहे. 27 ऑगस्टला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा 14 ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.

कोपरखैरणे पोलीस ठाण्यात आरोपीचा संशयास्पद मृत्यू,  CID चौकशी सुरु
कोपरखैरणे सेक्टर 19 येथे 22 वर्षाचा तरुण चोरी करताना रंगेहाथ पकडला गेलेल्या तरुणाला स्थानिक नागरिकांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाण झाल्यावर हा तरुण दोन तास कोपरखैरणे पोलिस ठाणे येथे होता. अचानक या तरुणाला उलट्या झाल्याने व चक्कर आल्याने बेशुध्द अवस्थेत तातडीने या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रुग्णालयाने या तरुणाला मृत घोषित केले. या तरुणाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला की जमावाने मारहाण केली याचा तपास पुणे येथील सीआयडी अधिकारी शुक्रवारी सायंकाळी उशिरा पर्यंत करत होते.

कोपरखैरणे येथे गुरुवारी मध्यरात्री एका चोरट्याला चोरी करताना रंगेहाथ जमावाने पकडले. यानंतर पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून पोलिसांना पाचारण करून या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या चोरट्याला पोलिस ठाण्यात दोन तास बसवून ठेवले. हा तरुण जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात बसला असताना अचानक या तरुणाची तब्येत गंभीर झाल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या. पोलिसांनी ताबडतोब या तरुणाला घेवून रुग्णालय गाठले. मात्र उपचारासाठी दाखल केल्यावर या तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

from maharashtra https://ift.tt/3g44tiZ
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports