शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१
कोरियन संस्थेकडून 'वाशिष्टी'चे सर्वेक्षण, महापुराच्या कारणांचा शोध, केंद्र सरकारला रिपोर्ट देणार  https://ift.tt/eA8V8J
चिपळूण : धरणांची सुरक्षा, पूर व्यवस्थापन, जल व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दक्षिण कोरियन 'वायओओआयएल' संस्थेने येथील महापुराची दखल घेतली आहे. या संस्थेची तज्ञ मंडळी येथे दाखल झाली आहे. ते गेले दोन दिवस वाशिष्ठी नदीचे सर्वेक्षण करीत महापुराच्या कारणांचा शोध घेत असून महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरमुक्ती आणि जलव्यवस्थानाबाबतचा अहवाल ते केंद्र सरकारला देणार आहेत.
<a href="https://ift.tt/3AgGvIS Flood : 'या' कारणामुळं चिपळूण शहरात पूर, अहवाल शासनाला सादर
<a href="https://ift.tt/2VNtWGe Flood : चिपळूण पुराचा वाद आता कोर्टात; पालिका या तीन विभागांना पाठवणार नोटीस!
येथील वशिष्ठी नदीपात्राची तसेच लगतच्या परिसराची पाहणी केली. गेली दोन दिवस हे काम सुरू होते.लघुपाट बंधारे विभागातील अभियंता विष्णू टोपरे व अन्य अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांच्याबरोबर पेढांबे ते गोळकोट पर्यंत वाशिष्टीच्या दोन्ही बाजूने सर्वेक्षण करण्यात आले.पूर परिस्थिती कशी ओढावली याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी स्थानिक रहिवासी ज्यांना अनेक वर्षे नदीचा गाळ काढण्यासाठी अनेक वेळा वाशिष्टीच्या नदीपात्रातुन जलाआंदोलने केली ते प्रकाश पवार यांनी स्थानिक पातळीवरील मुद्दे संबंधित अभियंताच्या लक्षात आणून दिले. तांत्रिक माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली चिपळूणात शिरणारे वाशिष्टीचे पाणी कोणत्या भागात शिरले त्यानंतर हे पाणी शहर व बाजारपेठेत कसे घुसते याबाबत पाहणी करण्यात आली.
पूरमुक्तीसाठी कार्यरत संस्था
वाशिष्टीच्या उपनद्या परिसरातून येणारे पावसाचे पाणी,कोयना अवजल असा सर्वकष विचार पाहणी करतेवेळी करण्यात आला.संबंधित अभियंत्यांनी गुगल मॅप प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. 22 व 23 जुलैला आलेल्या महापुरानंतर वाशिष्टीतून पाणी कोणत्या भागातून शहरात शिरले ही ठिकाणेही पाहाण्यात आली. आता या संदर्भात सविस्तर अहवाल तयार करून तो संबंधित अभियंता 'वायओओआयएल' संस्थेच्या दिल्ली कार्यालयाला पाठवणार आहेत.त्यानंतर संपूर्ण प्रकल्प तयार करून तो केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे.संबंधित संस्था पूर मुक्तीसाठी गेली चाळीस वर्ष कार्यरत आहे.
from news https://ift.tt/2UhRcMf
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
फॉलोअर
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
Recent Posts
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports