नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसच्या इतर पाच वरिष्ठ नेत्यांचे अकाऊंटही निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसने बुधवारी रात्री उशीरा ही माहिती दिली.

काँग्रेस पक्षाने सांगितलं की, पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, मनिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुश्मिता देव यांचेही ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील ज्या बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता त्याच फोटोला काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी रीट्वीट करुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. ट्विटरवर दबाव आणून, संबंधित बलात्कार पीडितेला न्याय न देता केंद्र सरकारने राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्याचा आरोप त्यांनी आपल्या ट्वीटमधून केला होता.

राहुल गांधींचे अकाऊंट तात्पुरते निलंबित
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं निलंबित करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. त्यानंतर ट्विटरने या संदर्भातील स्पष्टीकरण राहुल गांधीकडे मागितले होते.

कॉंग्रेसच्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्वीट करत या संदर्भात माहिती देण्यात आली होती. ट्वीटमध्ये कॉंग्रेसने म्हटले आहे की, "राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हे तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. राहुल गांधी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय राहतील."

राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवत या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/3CFbT5U Admission : अकरावी CET रद्द, नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी चुरस वाढली; विद्यार्थी, पालक चिंतेत

<a href="https://ift.tt/3sdOXpB Tope On Lockdown : राज्यात लॉकडाऊन कधी लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

आरक्षण विधेयकावर खासदार संभाजीराजे छत्रपतींना बोलू न दिल्याने राज्यसभेत जबरदस्त ड्रामा, संजय राऊत आक्रमक

from news https://ift.tt/3iFBaVW
https://ift.tt/eA8V8J
Home
Agriculturel
news
Twitter Account : राहुल गांधींनंतर रणदीप सुरजेवाला आणि पाच वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित
https://ift.tt/eA8V8J
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
Twitter Account : राहुल गांधींनंतर रणदीप सुरजेवाला आणि पाच वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports