Petrol Diesel Price Today 12th August 2021 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. तरिही गेल्या सव्वीस दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या सव्वीस दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती देशात स्थिर आहेत. गेल्या महिन्यात 17 जुलैनंतर तेलाच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या दिवशी पेट्रोलच्या दरात 29 ते 30 पैशांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती.

आज देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर 101.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आणि डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 102.08 रुपये, तर डिझेलचे दर 93.02 रुपये प्रति लिटर आहेत. तसेच, चेन्नईतही पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. चेन्नईत पेट्रोल 102.49 रुपये लिटर आहे, तर डिझेल 94.39 प्रति लिटरनं विकलं जात आहे.

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी देशात सध्या ऐतिहासिक उंची गाठली आहे. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी, भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या 24 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :

गेल्या अठरा दिवसांपासून दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमती स्थिर आहेत.

शहरं

पेट्रोलची किंमत

डिझेलची किंमत

दिल्ली

101.84

89.87

मुंबई

107.83

97.45

चेन्नई

102.49

94.39

कोलकाता

102.08

93.02

बंगळुरु

105.25

95.26

भोपाळ

110.20

98.67

चंदीगड

97.93

89.50

रांची

96.68

94.84

लखनौ

104.25

95.57

लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?

देशात इंधनदरवाढीच्या सत्राला ब्रेक लागून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी जागतिक स्तरांवर तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ 77 डॉलर प्रति बॅरल झालं होतं, या किमती मागच्या पंधरवड्यात 10 टक्क्यांहून कमी होत 68.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. जर या किमती आणखी काही दिवसांसाठी 70 डॉलर प्रति बॅरलहून कमी राहिल्या, तर येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होऊ शकते.

पेट्रोलच्या दरांमध्ये मे महिन्यापासून 41 वेळा वाढ झाली

पेट्रोलच्या दरांत चार मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर एकदा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरनं महाग झालं आहे. डिझेल राजस्थान, ओदिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

from news https://ift.tt/3xHTnGt
https://ift.tt/eA8V8J
Home
Agriculturel
news
Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीत दिलासा, आजही किमतींमध्ये बदल नाही, जाणून घ्या, सध्याचे दर
https://ift.tt/eA8V8J
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीत दिलासा, आजही किमतींमध्ये बदल नाही, जाणून घ्या, सध्याचे दर https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports