रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

IPL 2021: आयपीएलपूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी आनंदाची बातमी! https://ift.tt/eA8V8J

IPL 2021: आयपीएलच्या 14 व्या हंगामाचा दुसरा टप्पा यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी काही संघ यूएईला पोहोचले आहेत. बीसीसीआयने नुकतेच आयपीएल संघांना दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या खेळाडूंचा समावेश करण्याचा पर्याय दिला आहे. बोर्डाच्या निर्णयामुळे सर्व स्टार खेळाडू या स्पर्धेत परततील. या निर्णयानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, दुखापतीतून सावरल्यानंतर प्रमुख खेळाडू त्यांच्यात सामील होतील.

दिल्ली कॅपिटल्समध्ये अय्यर परतणार
आयपीएलमधील सर्वात शक्तिशाली संघांपैकी एक असलेला दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सामील होऊ शकतो. यामुळे संघाच्या फलंदाजीला बळ मिळेल. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलच्या बाहेर होता. त्याच्या जागी ऋषभ पंतला कर्णधारपद देण्यात आले होते. अय्यरच्या पुनरागमनाने संघाचा उत्साह वाढेल. मात्र, अय्यरला संघाची कमान दिली जाईल की ऋषभ पंत या हंगामात कर्णधारपद देणार हे पाहणे रंजक ठरेल. लवकरच हे चित्र स्पष्ट होऊ शकते.

नटराजन सनरायझर्स हैदराबादमध्ये येणार
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन पूर्वी शस्त्रक्रियेमुळे आयपीएलपासून दूर होता. आता तो संघात सामील होईल. नटराजन हैदराबादच्या आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्याने गेल्या हंगामात चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. एवढेच नाही तर त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून त्याला टीम इंडियामध्ये संधीही मिळाली. मात्र, दुखापतीमुळे त्याला काही महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले.

चेन्नई आणि मुंबईचे संघ यूएईला पोहोचले
अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जची टीम दुबईला पोहोचली होती. यानंतर, मुंबई इंडियन्सचे बहुतेक खेळाडू अलीकडेच अबू धाबीला पोहोचले आहेत. सध्या मुंबई इंडियन्सचे खेळाडू 6 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहेत. आयपीएलचे इतर काही संघ लवकरच यूएईला पोहोचण्याची शक्यता आहे.

आयपीएल 19 सप्टेंबरपासून सुरु होणार
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2021 चं 14 वं सत्र पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आयपीएल 2021 च्या बायो बबलमध्ये कोरोनाने प्रवेश केल्यामुळे आयपीएल मधेच थांबवली गेली होती. पण आता आयपीएल लीग पुन्हा एकदा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

from news https://ift.tt/3m6bsvU
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports