India vs England 2nd Test : इंग्लंडने पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट गमावत 119 धावा केल्या. मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडचे दोन विकेट लागोपाठ घेतले. तर मोहम्मद शमीने १ विकेट घेतले. इंग्लंडकडून रॉरी बर्न्सनं 49 धावा केल्या. एका रनने बर्न्सनचे अर्धशतक हुकले. जो रुट 48 आणि जॉनी बेअरस्टोने 6 धावांवर खेळत आहे

भारत आणि इंग्लंड यांच्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांसाठी खास ठरला. मात्र आज दुसऱ्या दिवशी फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताचा पहिला डाव 364 धावांवर संपला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट गमावत 276 धावांची खेळी केली. तर आज दुसऱ्या दिवशी भारताने 88 धावा केल्या. दुसरीकडे इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 62 धावा देऊन पाच बळी घेतले.

असा होता लॉड्स कसोटीचा पहिला दिवस :

केएल राहुल (नाबाद 127) आणि रोहित शर्मा (83) च्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट गमावत 276 धावांची खेळी केली. टॉसच्या वेळी पाऊस आल्यामुळे सामना जवळपास अर्धा तासानं सुरु करण्यात आला. इंग्लंडनं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याता निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली राहिली आणि रोहित शर्मा, केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, रोहित शर्माचं शतक मात्र हुकलं आणि तो 145 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि एक षट्काराच्या मदतीनं 83 धावा करत बाद झाला. फलंदाज म्हणून मैदानावर उतरलेल्या चेतेश्वर पुजारानं 23 चेंडूंवर एक चौकार लगावत नऊ धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीनं 103 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला धावांचा डोंगर रचण्यास मदत केली. पण, कोहली 103 चेंडूंमध्ये तीन चौकार लगावत 42 धावा करुन माघारी परतला.

from news https://ift.tt/3iHNXqz
https://ift.tt/eA8V8J
Home
Agriculturel
news
IND vs ENG, 1st Innings Highlights : दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या 3 बाद 119 धावा
https://ift.tt/eA8V8J
शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१
IND vs ENG, 1st Innings Highlights : दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या 3 बाद 119 धावा https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports