नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'आत्मनिर्भर नारीशक्ती संवाद' या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाग घेणार आहेत. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय आजीविका मिशन (DAY-NRLM) याच्याशी संबंधित बचतगटातील महिलांच्या समुहाशी संवाद साधणार आहेत.

आज दुपारी 12.30 वाजता 'आत्मनिर्भर नारीशक्ती संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला बचतगट समुहांशी संबंधित महिलांची प्रगती, विकास, शेतीच्या विकासामध्ये त्यांचे योगदान या गोष्टींशी संबंधित एका पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत.

या कार्यक्रमाशी संबंधित पंतप्रधानांनी एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, "देशातील बचत गट समुहांची संख्या मोठी आहे. मी आत्मनिर्भर नारीशक्ती या कार्यक्रमात भाग घेणार आहे. या दरम्यान मला समुहातील महिला सदस्यांशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या समुहांना काही रक्कम वर्ग केली जाणार असून त्यामुळे त्यांच्या कामाला अधिक गती मिळेल."

During the programme tomorrow, I would get the opportunity to interact with women SHG members. Developmental assistance to various SHGs will also be released. This will give impetus to the working of these groups and enable more women to contribute towards national welfare.
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2021

केंद्र सरकारच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना बचतगटांशी जोडलं जाणे. या माध्यमातून गरीब वर्गाला दीर्घ कालावधीसाठी आर्थिक मदत केली जाते.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/3CFbT5U Admission : अकरावी CET रद्द, नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी चुरस वाढली; विद्यार्थी, पालक चिंतेत

<a href="https://ift.tt/3lUlCPQ Case : सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला कोर्टाचा दणका, पुन्हा एकदा जामीन फेटाळला

<a href="https://ift.tt/3lXgTwL Account : राहुल गांधींनंतर रणदीप सुरजेवाला आणि पाच वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित

from news https://ift.tt/3ADtlG3
https://ift.tt/eA8V8J
Home
Agriculturel
news
पंतप्रधानांचा आज 'आत्मनिर्भर नारीशक्ती संवाद'; बचत गट महिला समुहांशी संवाद
https://ift.tt/eA8V8J
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
पंतप्रधानांचा आज 'आत्मनिर्भर नारीशक्ती संवाद'; बचत गट महिला समुहांशी संवाद https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports