अमरावती : स्वतःला 'बाजीराव सिंघम' समजून हाती पिस्टल घेऊन स्टंट करणाऱ्या अमरावतीच्या चांदूर बाजार येथील पोलिस कॉन्स्टेबलला निलंबित केलं खरं मात्र हे निलंबन आठ दिवसाच्या आतच मागे घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे निलंबन मागे घेतल्यानंतर या पोलिसाला शुभेच्छा देणारे बॅनर चांदूरबाजार शहरात लागले आहेत. अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार येथील पोलिस महेश मुरलीधर काळे यांनी शासकीय गणवेशामध्ये हातात पिस्टलसारख्या शस्त्राचा वापर करून व्हिडीओ तयार केला होता. सदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं. शासकीय गणवेशाचा आणि शस्त्राचा गैर उपयोग केल्याचे बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनाबदल पोलिस अंमलदार महेश काळे यांना पोलिस अधीक्षक डॉ हरि बालाजी अमरावती ग्रामीण यांनी निलंबित केलं होतं.

'कायद्याचा बालेकिल्ला, ओन्ली अमरावती जिल्हा' म्हणत पिस्तुल घेऊन व्हिडीओ काढणं पोलिसाला महागात

कायद्याचा बालेकिल्ला, ओन्ली अमरावती जिल्हा म्हणत पिस्तुल घेऊन व्हिडीओ काढणारा पोलीस शिपाई महेश काळे पुन्हा सेवेत रुजु झाला आहे. अवघ्या तीन दिवसात पोलीस अधीक्षकांनी निर्णय बदलला आहे. निलंबन रद्द झाल्याची माहिती मिळताच चांदूरबाजार शहरात पोलीस शिपाई महेश काळेचे शुभेच्छाचे बॅनर लागले आहेत. महेश काळे याला सध्या चांदूरबाजार वरून मेळघाटातील धारणी पोलीस स्टेशनला रुजू करण्यात आलं आहे.

<a href="https://ift.tt/3jqMapk : पोलिसाला हातात पिस्तूल घेऊन व्हिडिओ करणे महागात, पोलीस शिपाई महेश काळेचं निलंबन

या पोलिस कॉन्स्टेबलच्या 'स्टंट'चा व्हीडिओ व्हायरल होताच अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन. यांनी तत्काळ या कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई केली होती. इतकेच नव्हे तर सर्वच पोलिस ठाण्यांना सूचना देऊन, 'तुमच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचे असले प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत..' असा कडक दम देखील दिला होता.

या व्हिडीओत नेमकं काय म्हटलं होतं

'अमरावती जिल्ह्यात प्रवेश करताना दादागिरी आणि भाईगिरी दहा किलोमीटर लांबच ठेवून यायचं भाऊ.. अमरावतीत जो कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार.. कारण कसंय ना कायद्याचा बालेकिल्ला, ओन्ली अमरावती जिल्हा..' असं या व्हिडीओत म्हटलं आहे. हा व्हिडीओ करताना काळे हे पोलिसांच्या शासकीय गणवेशात आहेत. सोबतच त्यांच्या हातात एक पिस्तुल देखील दिसत आहे. सोशल माध्यमावर जरी या व्हिडीओला पसंती मिळत असली तरी काळे यांना मात्र या व्हिडीओमुळं निलंबित केलं आहे.

from maharashtra https://ift.tt/3xzgDq8
https://ift.tt/eA8V8J
Home
maharashtra
अमरावतीच्या पिस्तुल घेऊन व्हिडीओ काढणाऱ्या पोलिसाचं निलंबन रद्द झाल्यानंतर लागले शुभेच्छांचे बॅनर
https://ift.tt/eA8V8J
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
अमरावतीच्या पिस्तुल घेऊन व्हिडीओ काढणाऱ्या पोलिसाचं निलंबन रद्द झाल्यानंतर लागले शुभेच्छांचे बॅनर https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports