शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकरांना धमकी, क्राईम ब्रांचकडून तपास सुरु   https://ift.tt/eA8V8J

मुंबई : मुंबई पोलिस (Mumbai Police) सध्या अशा एक व्यक्तीचा शोध घेत आहेत ज्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना धमकी दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तिनं धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे याचा तपास सोपवण्यात आला असून चौकशी सुरु आहे.

<a href="https://ift.tt/2VVQEfa Day : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईत सुरक्षाव्यवस्था तगडी, मुंबई पोलिसांचं मिशन ऑलआऊट

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला. यात आपल्या काही मागण्या पूर्ण करण्यास सांगितलं आहे. आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी या व्यक्तीने दिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून पैश्यांची मागणी

हा मेसेज मिळताच मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.  नार्वेकर शिवसेनेचे सचिव असून ते मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक देखील आहेत. ठाकरे परिवाराचे विश्वासू मानल्या जाणाऱ्यांपैकी त्यांचं नाव आघाडीवर आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. याबाबत एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, हा मेसेज करण्यासाठी ज्या नंबरचा वापर झाला आहे तो नंबर कुठल्यातरी अॅप्लिकेशनचा वापर करुन घेतलेला आहे ज्याला व्हर्चुअल नंबर असं देखील म्हणतात. आम्ही मोबाईल कंपन्यांकडे या नंबरविषयी माहिती मागवली आहे. या प्रकरणामागे नेमकं कोण आहे याची माहिती घेण्याचं काम सुरु आहे.

दोन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या आवाजाची नक्कल करत मंत्रालयात फोन

गुरुवारी क्राईम ब्रांचच्या अँटी एक्टोर्शन सेलने तीन लोकांना अटक केली आहे. या तिघांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह यांना फोन करत ट्रान्सफर पोस्टिंगची मागणी केली होती. पुण्यात देखील शरद पवार यांचा आवाजात बोलून व्यवहारात पैश्यांची मागणी केल्याचं समोर आलं होतं.

from news https://ift.tt/3xFwGCQ
https://ift.tt/eA8V8J
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.

फॉलोअर

Slider Widget

5/recent/slider

हा ब्लॉग शोधा

Recent Posts

Comments

recentcomments

Featured Posts

Recent Posts

Recent in Sports