India vs England: पावसामुळं इंग्लंडविरोधातील पहिला कसोटी सामना अनिर्णित झाल्यानंतर आजपासून दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडला दोन मोठे धक्के बसले आहेत. इंग्लंडचे दोन वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे सामन्यातून बाहेर झाले आहेत. जेम्स अँडरसनच्या जागी क्रेग ओवरटन तर ब्रॉडच्या जागी साकिब महमूद अंतिम अकरामध्ये असतील अशी शक्यता आहे. सोबतच इंग्लंडच्या संघात युवा ओपनर हसीब हमीदचं पुनरागमन होऊ शकतं तसंत अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला देखील अंतिम अकरा मध्ये स्थान मिळू शकतं.

इंग्लंडच्या 24 वर्षीय हसीब हमीदने 2016 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केलं होतं. यात पहिल्या टेस्टमध्ये त्यानं शानदार 82 धावांची खेळीही केली होती. त्या मालिकेनंतर त्याला संघात जागा मिळाली नव्हती. पहिल्या कसोटीत इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर रोरी बर्न्स आणि डॉमिनिक सिब्ली दोघेही चांगली खेळी करु शकले नाहीत. त्यामुळं दोघांपैकी एकाला डच्चू मिळू शकतो. सोबतच बेन स्टोक्स आणि क्रिस वोक्सच्या अनुपस्थितीत मोईन अलीला संघात स्थान मिळू शकतं. भारताकडून देखील आर अश्विनला दुसऱ्या कसोटीत संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

इंग्लंडविरुद्धच्य पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज होती. टीम इंडियाकडे 9 विकेट्स शिल्लक होत्या मात्र शेवटच्या दिवशीचा खेळ पावसामुळं होऊच शकला नाही. पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांवर संपुष्टात आला होता. तर भारताने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 52 धावा केल्या होत्या. इंग्लंडने कर्णधार जो रुटच्या शतकाच्या बळावर दुसऱ्या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. भारताकडून पहिल्या डाव चार विकेट्स घेणाऱ्या बुमराहने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या.

पहिल्या डावात इंग्लंडला भारताने 183 धावांवर गुंडाळले होते. कर्णधार रुटच्या अर्धशतकाशिवाय कुणीही मोठी खेळी करु शकलं नाही. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूरच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ 183 धावांवर आटोपला. इंग्लंडचा डाव 183 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी 97 धावांची दमदार सलामी दिली होती. मात्र त्यानंतर राहुल आणि जाडेजा वगळता टीम इंडियाकडूनही कुणाला मोठी खेळी करता आली नाही. जाडेजाने ८ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी खेळी केली. त्यानंतर आलेल्या जसप्रीत बुमराहने फटकेबाजी करत 28 धावा केल्या होत्या. त्यामुळं भारताचा पहिला डाव 278 धावांवर गुंडाळला. भारताकडून राहुलनं 84, जाडेजानं 56 धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात रॉबिन्सननं 5 तर अॅंडरसननं 4 विकेट्स घेतल्या होत्या.

from news https://ift.tt/2VFCCyl
https://ift.tt/eA8V8J
Home
Agriculturel
news
Eng vs India : भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून दुसरी कसोटी, सामन्यापूर्वी इंग्लंडला दोन मोठे धक्के, दिग्गज खेळाडू बाहेर
https://ift.tt/eA8V8J
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
Eng vs India : भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून दुसरी कसोटी, सामन्यापूर्वी इंग्लंडला दोन मोठे धक्के, दिग्गज खेळाडू बाहेर https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports