पुणे : पुणे महापालिकेच्या कारभारावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (29 जून) मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांना निमंत्रण दिलं असलं तरी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण दिलेलं नाही. महापालिकेत सत्ता राबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आयुक्तांचा वापर करत असल्याचा आरोप भाजप करत आहे. तर भाजपला कारभार करता येत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे, तब्बल 100 नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महापालिकेत अजित पवार यांच्या मर्जीतील आयुक्त आले आहेत. त्यांच्यामार्फत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपकडून केला जातो.

अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी कोणाला निमंत्रण?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बोलावलेल्या या बैठकीला राज्याच्या मंत्रिमंडळातील आठ मंत्री, वेगवेगळ्या पाच खात्यांचे सचिव आणि पुणे महापालिकेचे आयुक्त उपस्थित असणार आहेत. तसंच पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदारही या बैठकीला उपस्थित असतील. मात्र या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. पुणे महापालिकेच्या अखत्यारित येणारे विषय बैठकीत चर्चिले जाणार आहेत. जसे की पुणे महापालिकेतर्फे म्हाडाच्या इमारतीचा पुनर्विकास, जुन्या शाळांच्या काही जागा महापालिकेला हस्तांतरित करणे असे हे विषय आहेत.

सत्ता भाजपची असली तरी कारभारी अजित पवार?
महापालिकेने निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारकडे जात असतात. यासाठी अजित पवारांनी बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण दिलं असलं तरी भाजपच्या कोणत्याही प्रतिनिधीला किंवा महापौरांना आमंत्रित केलेलं नाही. यावरुन स्पष्ट दिसतं की, पुणे महापालिकेत सत्ता जरी भाजपची असली तरी अंतिम निर्णय राज्य सरकारकडे असतात. हे निर्णय घेताना अजित पवार पूर्णपणे त्यांच्या अधिकारांचा वापर करतात.

दरम्यान काही महिन्यांवर पुणे महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका काबीज करण्यासाठी अजित पवार पूर्णपणे त्यांच्या सत्तेचा, अधिकाराचा उपयोग करताना दिसत आहेत.

from news https://ift.tt/3jozkJN
https://ift.tt/eA8V8J
Home
Agriculturel
news
पुणे महापालिकेत भाजपची सत्ता, मात्र अधिकाऱ्यांमार्फत अजित पवार कारभारी?
https://ift.tt/eA8V8J
मंगळवार, २९ जून, २०२१
पुणे महापालिकेत भाजपची सत्ता, मात्र अधिकाऱ्यांमार्फत अजित पवार कारभारी? https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports